सोलापूर : सोलापूर शहरात शनिवारी सकाळी आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून फुटपाथ वरील वंचित ,निराधार, अशा लोकांना अभ्यंग स्नान घालून त्यांना नवीन कपडे दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या समावेत फटाके फोडत दिवाळी साजरी करतात त्यांच्या या कार्यामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो हे पाहिलं की आपण दिवाळी साजरी केल्याचे समाधान वाटते असे मत वकील संतोष न्हावकर यांनी व्यक्त केले.
आस्था सामाजिक संस्था सोलापूर यांच्यावतीने भिक्षुंना अभ्यंग स्नान व कपडे फराळ वाटप कार्यक्रमाचे पूर्व मंगळवार पेठ शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एड. संतोष न्हावकर हे बोलत होते.
यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, उद्योजक हर्षल कोठारी, संचालक देविदास चेळेकर, उद्योजक महेंद्र सोमशेट्टी,सचिव शिदानंद सावळगी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छचुरे, योगेश कुंदूर, वेदांत तालिकोटी , सिद्धू बेऊर , बाहुबली शेटगार , सुरज छचुरे, आधीसह आस्था संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भिक्षूंना अभ्यास स्नान घालून त्यांना तेल ,उठणं, साबण नवीन कपडे,, लाडू ,चिवडा, शंकरपाळी मिठाई बॉक्स फटाके ,फुलबाजा, झाड व दिवाळीचा पदार्थ भेट देण्यात आला तर 200 महिलांना साडी व फराळ वाटप करण्यात आले.
कष्टकऱ्यांची व भिक्षुकांची झाली दिवाळी गोड आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने भिक्षूंना व कष्टकरी आणि निराधार लोकांना अभ्यंग स्नान घालून त्यांचा यथोचित सन्मान करून दिवाळीचा फराळ देण्यात आल्याने दीडशे ते 200 लोकांची दिवाळी गोड झाली आहे. सर्वांना मदत करणं हाच हेतू आपण आपल्या घरामध्ये कुटुंबाची दिवाळी तर साजरी करतोच पण समाजातील वंचित घटक कष्टकरी आणि फुटपाथवर भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्या नागरिकांची दिवाळी साजरी करण्याकरिता आम्ही हा मदतीचा मार्ग स्वीकारला आहे गेल्या नऊ वर्षापासून हे कार्य अखंड सुरू आहे. असे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी म्हणाले