वसमत / हिंगोली – वसमत एस.टी. आगारात आज (दि.१३ नोव्हेंबर) दुपारी सुमारे १२.३० वाजता मोठी दुर्घटना घडली. एस.टी. बसमध्ये डिझेल भरण्याच्या वेळी अचानक पंपाच्या नोजलमध्ये बिघाड झाल्याने पंपाला पेट लागला. या आगीत ड्युटीवर असलेली एक महिला कर्मचारी गंभीररीत्या भाजली असून, सहकाऱ्यांनी तिला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे दाखल केले आहे.
घटनेनंतर आगार परिसरात काही काळ गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी, या घटनेने एस.टी. आगारातील निष्काळजीपणाचा चेहरा उघड केला आहे. सुरक्षा उपाययोजना, अग्निशमन साधने आणि उपकरणांची तपासणी नियमित होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, आगार प्रमुख केवळ ‘आप-डाऊन’ करत असल्याने वसमत आगार आणि बसस्थानकाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
मुख्यालयी कायम अनुपस्थित राहिल्याने वाहन दुरुस्ती, डिझेल पुरवठा, कर्मचारी शिस्त आणि प्रवाशांच्या सुविधा याबाबतीत गंभीर निष्काळजीपणा वाढला आहे.
वसमत्वासी यांच्या म्हणणे आहे की, “अधिकारी फक्त हजेरीसाठी येतात आणि लगेच परत जातात, त्यामुळे निर्णयक्षम नेतृत्वाचा पूर्ण अभाव निर्माण झाला आहे.”बसस्थानकाचीही अवस्था अत्यंत बिकट आहे. प्रवाशांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, बसण्याची जागा आणि महिलांसाठी मूलभूत सुविधा नाहीत. व तसेच मागील दोन वर्षापासून हिरकणी कक्ष पर्यायी व स्थानकात कंत्राकदाराने तयार केला नाही आणि एका कुलूप बंद दरवाजावर हिरकणी कक्ष असे लिहिलेले आहेनागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.सदर घटनेची चौकशी एस.टी. प्रशासनाकडून सुरू असून, डिझेल पंपातील बिघाड तांत्रिक होता की निष्काळजीपणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.मुख्यालयी अधिकारी गैरहजर राहिल्याने वसमत एस.टी. आगारातील प्रशासन कोलमडले आहे. अधिकारी फक्त ‘आप-डाऊन’ करतात, त्यामुळे बसस्थानक आणि आगार दोन्ही ठप्प झाले आहेत,” असा आरोप करण्यात आला आहे.
















