बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयात महाराष्ट्र शासन कला संचालनालय यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी वखारिया विद्यालय उपळे दुमाला या केंद्राचा ९५.६२% निकाल लागला.
या केंद्रांतर्गत संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे, नागनाथ प्रशाला जामगाव, मित्र विद्यालय माळेगाव, आदर्श विद्यालय रातंजन, माध्यमिक हायस्कूल हळदुगे, जय हनुमान प्रशाला झरेगाव, वखारिया विद्यालय उपळे दुमाला या शाळा सहभागी झाल्या होत्या.
परीक्षेला केंद्रामध्ये एकूण ४०७ विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री ए ग्रेड-३१, बी ग्रेड-९२, सी ग्रेड -७३ व इंटरमिजिएट ए ग्रेड-१६, बी ग्रेड-७५, सी ग्रेड-८४ मिळवून उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर व केंद्र समन्वयक एन.एन. महाले यांनी परिश्रम घेतले. या यशामुळे उपळे दुमाला व परिसरात कौतुक होत आहे.
















