Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मोहोळ-वैराग मार्गावर जीवघेणा सापळा; रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्यात उघडे लोखंडी रॉड

तरुण भारतbyतरुण भारत
April 13, 2026
in editor
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळूज – मोहोळ ते वैराग या महत्त्वाच्या दळणवळणाच्या मार्गावर मालिकपेठ येथे रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्याची अत्यंत धोकादायक अवस्था उघडकीस आली आहे. रस्त्याच्या पृष्ठभागातून लोखंडी रॉड उघडे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, हा रस्ता अक्षरशः अपघाताला आमंत्रण देणारा ‘जीवघेणा सापळा’ ठरत आहे.

हा रस्ता प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि व्यापारी वर्ग या मार्गाचा नियमित वापर करतात. अशा परिस्थितीत रस्त्याची ही बिकट अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

सिमेंट रस्त्याच्या पृष्ठभागातून बाहेर आलेले धारदार लोखंडी सळई कोणत्याही क्षणी वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू शकतात. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनांचे टायर फुटणे, वाहन घसरणे, अचानक तोल जाऊन पडणे अशा घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. काही वाहनचालकांनी या ठिकाणी थोडक्यात बचाव झाल्याच्या घटनाही सांगितल्या आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी काही काळापूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कालांतराने सिमेंटचा थर उखडून गेला असून आतील लोखंडी सळई उघड्यावर आल्या आहेत. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने काम पूर्ण झाल्यानंतर योग्य देखरेख न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

रात्रीच्या वेळी या ठिकाणी धोका आणखी वाढतो. अपुरी प्रकाश व्यवस्था, कोणतेही इशारा फलक नसणे आणि रस्त्यावर उघडे पडलेले रॉड—या सर्व बाबी अपघातासाठी पोषक ठरत आहेत. अंधारात वाहनचालकांना हे रॉड दिसत नसल्यामुळे अचानक अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याखाली लपलेले लोखंडी रॉड वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होतो. याशिवाय, या ठिकाणी रस्त्याला मोठे वळण असल्याने धोका आणखी वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर यंत्रणांनी तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचा ठपका प्रशासनावर बसणार असल्याची तीव्र भावना परिसरात व्यक्त होत आहे.

 इन बॉक्स : नागरिकांच्या तातडीच्या मागण्या-

•उघडे पडलेले लोखंडी रॉड तात्काळ काढून सुरक्षित करणे किंवा त्यांना कव्हर बसवणे.

•खराब झालेल्या सिमेंट रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे.

•धोकादायक ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड्स व रिफ्लेक्टर बसवणे•

•रात्रीसाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे.

•निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणे

 बाइट : दत्तात्रय कादे (स्थानिक नागरिक)

“मोहोळ-वैराग मार्गावर मालिकपेठ येथे रेल्वे पुलाजवळ सिमेंट रस्त्यातील लोखंडी रॉड उघडे पडले आहेत. दुचाकीवरून जाताना खूप भीती वाटते. टायर फुटण्याचा आणि घसरून पडण्याचा धोका कायम असतो. विशेषतः रात्री तर काहीच दिसत नाही. हे तात्काळ दुरुस्त करायला हवे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, ही आमची ठाम मागणी आहे.”

Post Views: 88
Previous Post

महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; सर्वरोग तपासणी शिबिरात ९२ जणांची मोफत तपासणी 

Next Post

महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

महात्मा ज्योतीबा फुले जयंती गैबीपीर उर्दू स्कूल येथे साजरी

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887425

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697