अक्कलकोट – स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने तालुक्यातील गुरववाडी येथील सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना देण्यात आलेले आदर्श सरपंच हा राज्यस्तरीय पुरस्कार अत्यंत मानाचा आहे. लक्ष्मी पुजारी यांच्या कार्याची ही मोठी पोचपावती आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना लाभलेले आदर्श सरपंच पुरस्कार म्हणजे सर्व सरपंचांसाठी प्रेरणादायी पुरस्कार असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
नुकतेच स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने तालुक्यातील गुरववाडीचे सरपंच लक्ष्मी पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये सरपंच लक्ष्मी पुजारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सरपंच लक्ष्मी पुजारी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव प्राप्तकर्त्या अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांनी आपल्या कार्यकाळात गुरववाडीचे नाव तालुक्याच्या तख्तावर उज्वल केले आहे. यावेळी गुरववाडीचे राजाराम विजापुरे, विजय मोती, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – सरपंच लक्ष्मी पुजारी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.




















