धाराशिव – आदिवासी पारधी समाजाला सत्तेत संधी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आदिवासी पारधी महासंघाने जाहीर पाठिंबा देत भाजपा महायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे. तसेच तमाम आदिवासी पारधी समाज बांधवांनी जिल्ह्यातील भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करावे, असे आवाहन आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.
सुनील काळे यांनी सांगितले की, जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत आदिवासी पारधी समाजाला तीन जागा दिल्या होत्या. त्या जागा बहुमताने निवडून आणल्या. त्याचप्रमाणे ढोकी जिल्हा परिषद गटातून आदिवासी पारधी समाजातील तडफदार तरुण उमेदवार संजू पवार यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव हा पाठिंबा देत असून जिल्ह्यातील भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहनही आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.


















