Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूजमध्ये अग्नितांडव : दोन चाकी, चार चाकिसह कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक 

तरुण भारतbyतरुण भारत
February 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – येथील महावीर पथावरील जैन मंदिराशेजारी रूपाली मशनरी या दुकानास पहाटे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने जीवित हानी झाली नाही  चार्जिंगला लावलेली दोन चाकी पहाटे साडेचार ते पाच च्या दरम्यान पेटल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दुसरी संघामध्ये शॉर्टसर्किटने आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे  लागलेल्या आगीत चार चाकी दोन चाकी दोन वाहनासह  दुकानातील कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

याबाबत उपस्थितांच्या चर्चेतून समजलेली प्राथमिक माहिती अशी की, अकलूज येथील महावीर मंदिराला चिकटून असणाऱ्या रुपाली मशीनरी या पाईप, सबमरसिबल व विहिरीवरील मोटरी विकणाऱ्या दुकानाला पहाटे आग लागली. दुकानाच्या बाहेर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इलेक्ट्रिकल दुचाकी चार्जिंगला लावली होती. ती ओव्हर चार्ज होऊन पेटली असावी किंवा दुकानातील वायरिंग शॉर्ट सर्किट झाले असावे असे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.  दुचाकी पेटल्यानंतर तिच्या शेजारी असलेल्या चार चाकी वाहनाने पेट घेतला. या दोन्ही वाहणाने पेट घेतल्यामुळे दुकानाला आग लागली. सदर दुकानामध्ये विहिरीवरील मोटरी, पिव्हीसी पाईप, केबल, तांब्याच्या तारा असा माल असल्यामुळे आग भडकली. कोट्यावढी रुपयांचा माल या आगीत जळून खाक झाला आहे.

आगीची माहिती समजताच अकलूज नगर परिषदेचे टँकर बोलवण्यात आले. या टँकरची प्रेशर क्षमता कमी असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखाना, यशवंतनगर येथील सहकार महर्षी साखर कारखाना व सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखान्याच्या अग्निशमनच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आली. अकलूज नगर परिषदेचे दोन टँकर पाच वेळा भरून आणावे लागले. सुमारे दहा ते पंधरा गाड्या भरून पाणी मारल्यानंतर आग विझली.

पुढील बाजूस दुकान आणी मागील बाजूस घर अशी रचना होती. घरामध्ये सुहास श्रेणिक गांधी, त्यांची दोन मुले, सुन व दोन नातू इतके लोक रहात होते. आग दुकानाच्या तोंडालाच लागली असल्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घरामागील खिडक्या तोडून आतील लोकांना बाहेर काढले. पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी येऊन त्या रोडवरील वाहतूक वळवली. जेसीबीच्या सहाय्याने शटर, ग्रील तोडून दुकानात पाणी मारले. दुकानाला लागलेली आग प्रचंड भडकलेली होती. ती शेजारील एच डी एफ सी बँकेत पोहोचली. आगीमुळे बँकेचा दरवाजा, पुढील भाग, ए टी एम रूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील जैन समाजाच्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी खूप मेहनत घेतली. आगीची माहिती समजताच माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश व्होरा, आदित्य आर्वे, नगरसेवक महेश शिंदे, योगेश गांधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यत आग विझवण्याचे काम सुरु होते.

सन 2021 साली अकलूज नगर परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. 2021 पासून जानेवारी 2026 पर्यंत नगर परिषदेवर प्रशासकाचा कारभार चालत होता. या काळात नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा अद्यावत करण्यात आली नाही. आज जेव्हा आग लागली तेव्हा नगर परिषदेचे टँकर कुचकामी ठरले. या टँकरने कितीही पाणी मारले तरी आग विझत नव्हती. जेव्हा परिसरातील साखर कारखान्याच्या गाड्या आल्या व त्यांनी प्रेशरने पाणी मारले तेव्हा आग विझली. अकलूज नगर परिषदेने आपली अग्निशमन यंत्रणा आद्यवत करून घेणे गरजेचे आहे.         

अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्ष रेश्मा आडगळे उप नगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली 

Post Views: 50
Previous Post

आदिवासी पारधी महासंघ भाजपा महायुतीच्या पाठीशी – प्रदेशाध्यक्ष सुनील काळे

Next Post

रामसखा बडवे यांना काण्ववेद पाठशाळेचा ब्रम्हभूषण पुरस्कार व पंकजदेव महाराज यांना काण्ववेद पुरस्कार अर्पण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रामसखा बडवे यांना काण्ववेद पाठशाळेचा ब्रम्हभूषण पुरस्कार व पंकजदेव महाराज यांना काण्ववेद पुरस्कार अर्पण

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसनेत्याच्या नातवाने दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा #viral #solapurnews #news

September 17, 2026

आंबेडकरांवरील वाक्य भोवले अखेर आमदार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल #viral #solapurnews #news

September 17, 2026

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1222701

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!