सोलापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ तंत्रज्ञानाची नवी लाट नसून तरुणांच्या करिअरला वेग देणारे प्रभावी साधन ठरत आहे. डिजिटल कौशल्यांच्या जोरावर घरबसल्या उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होत असताना एआयच्या मदतीने वेळेची बचत, कामातील अचूकता आणि उत्पन्नवाढ शक्य होत असल्याचे सांगून बदलत्या स्पर्धात्मक युगात एआयचे ज्ञान आत्मसात करणे हे करिअर घडविण्यासाठी अत्यावश्यक ठरत असल्याचे असल्याचे मत ‘डिजिटल आजादी’ या भारतातील आघाडीच्या डिजिटल शिक्षण उपक्रमाचे निर्माते संदीप बन्साली आणि ओंकार गायकवाड यांनी व्यक्त केले.
विडी घरकुल येथील बटरफ्लाय गार्डन स्कूलमध्ये विजय डिजिटल बिझनेस सोल्युशन्स’ या ऑफलाइन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या वेळी डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून स्वयंपूर्ण उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणाले,सोशल मीडिया, मोबाईल अॅप्स व इतर डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून दरमहा सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कसे मिळवता येऊ शकते, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह सविस्तर विवेचन त्यांनी केले..
एआयचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या व्यवसाय, नोकरी किंवा स्वतंत्र उपक्रमासाठी कसा करता येईल, वेळेचा योग्य उपयोग करून अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण करता येतील, याबाबत माहिती देण्यात आली.
हा कोर्स दोन ते अडीच महिन्यांचा असून डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया ब्रँडिंग, ऑनलाइन बिझनेस मॉडेल्स आणि एआय टूल्सच्या वापरावर आधारित आहे. या कोर्ससाठी पहिल्या २५ जणांना ५० टक्के शुल्क सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा ‘विजय डिजिटल बिझनेस सोल्युशन्स’चे संचालक डॉ. विजय देगावकर यांनी केली.
सोलापुरातील तरुणांनी आणि इच्छुकांनी डिजिटल माध्यमांचा सकारात्मक व उत्पादक वापर करून स्वावलंबी बनावे, असे आवाहनही डॉ.देगावकर यांनी केले.
























