वळसंग : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बार्शी शहर पालिका निरीक्षक पदी वळसंग चे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संजय गायकवाड यांना नेमणूक करण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रणिती शिंदे, प्रभारी मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभा प्रमुख, तालुका, ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख नेते यांच्याशी समन्वय साधून निवडनुकीच्या प्रचार यंत्रणा समिती सोबत ठेवून सर्व कार्य राबवण्याची दृष्टीने निरीक्षकावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
त्याप्रमाणे बार्शी शहराच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडणुकीच्या संपूर्ण जबाबदारी वळसंगचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.संजय गायकवाड यांना देण्यात आली आहे.




















