Sunday, May 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून निघणारा संदेशच जगाला विनाशापासून वाचवेल

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर –  “भारतीय संस्कृतीचे वसुधैव कुटुंबकम् व एकं सत् विप्रा बहुदा वदंती हा संदेशच जगाला विनाशापासन वाचवू शकतो. हाच संदेश रामेश्वर रूई येथे साकारलेल्या एकमेवाद्वितीय अशा ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवना’ च्या माध्यमातून संपूर्ण जगाला देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगात शांती नांदेल अशी श्रध्दा आणि पूर्ण निष्ठा आहे.” असे विचार विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.


विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर रुई यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनात’ लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे यांच्या लेखणीतून विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माची प्रयोगशाळा या संकल्पनेवर आधारीत  ‘विश्वशांतीची महागाथा’ व संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संघर्षमय जीवनाचं सुंदर आख्यान महाकादंबरी ‘सुवर्णपिंपळ’ या ग्रंथांचे प्रकाशन विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, डॉ. हनुमंतराव कराड, वरिष्ठ सल्लागार गिरीश दाते, संचालक डॉ. महेश थोरवे, डॉ. राऊत आणि योगेश पारखी उपस्थित होते.


डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” सध्या संंपूर्ण जगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सुख सुविधांसह झालेली परकोटीची भौतिक प्रगती असूनसुद्धा दुसरीकडे हिंसा, रक्तपात, द्वेष, गोंधळ, अराजकता, जातीधर्मातील तेढ, देशांच्या सीमा या सारख्या क्षुल्लक कारणांमुळे अत्यंत संशय, भिती व तणावाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते. आश वेळेश रामेश्वर रुई येथे उभारण्यात आलेल्या विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनातून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यात येत आहे.”


गिरीश दाते म्हणाले,” विज्ञानाच्या पायावर उभे राहून अध्यात्माचा दिवा पेटवणारे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांना स्वामी विवेकानंदांच्या तत्वधारेचा शेला बांधून विश्वशांती महायज्ञाचा आरंभ केला. त्यांनी विज्ञानाच्या शक्तिरूप हातात अध्यात्माच्या हृदयातला करुण रस सोपवला आहे. यातून विश्वशांती घडावी हे त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे.”


डॉ. महेश थोरवे म्हणाले,” विश्वशांती या संकल्प यात्रेचे शांतीदूत म्हणजे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड आहेत. त्यांचा एकूणच प्रवास ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म या तत्वमालेशी संवाद साधणारा आहे. त्यांनी रामेश्वर रुई या जन्मगावी बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी मशीद उभारली, रामसेतू बांधला तसेच आता विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनाचा उभारणी केली आहे. त्यांचे हे कार्य अद्वितीय आहे.”


लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे म्हणाले,”जग हे तंत्रज्ञानाच्या वेगाने एक विशिष्ट मार्गावर धावत आहे. याच महामार्गावरून  प्रवास करताना प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी या वेगाला दिशा देणारा आत्मा नेमका कुठे आहे याचे मर्म जाणले. आयुष्यात परिवर्तन घडवून ज्ञानाची अद्भुत मंदिरं उभे केली. शिक्षण संस्था हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माची प्रयोगशाळा म्हणून उभी केली. त्यांनी सर्व धर्मातल्या माणसांना माणुसकीच्या सुंदर धाग्यांनी आणि स्वर बंधाने जोडले आहे.”
योगेश पारखी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Post Views: 33
Previous Post

जुन्या नव्यांचा मेळ घालून महापालिका निवडणूक ताकदीनिशी लढू – महेश गादेकर

Next Post

काँग्रेसचे निवडणूक बार्शी निरीक्षक पदी ॲड.संजय गायकवाड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

काँग्रेसचे निवडणूक बार्शी निरीक्षक पदी ॲड.संजय गायकवाड

ताज्या बातम्या

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

पैसे नव्हे थेट एटीएम पळवली #marathinews #viral

May 17, 2026

मेफेड्रोन प्रकरणी साहिल पिरजादेला वाढीव कोठडी #marathinews #solapurnews

May 17, 2026

जुळे सोलापूरात होंडा दुचाकी गोडाऊन भागात लागली आग

May 17, 2026

दूध टँकर कारची धडक ; १ ठार ,२ जखमी #marathinews

May 17, 2026

चंद्रभागेच्या पात्रात बुडून एका भाविकाचा मृत्यू #viral #marathinews

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868223

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697