मुंबई, ६ जुलै (हिं.स.) : जागतिक नियुक्ती प्लॅटफॉर्म इंडीडने भारतातील एआय नोकऱ्यांसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या कौशल्यांचा डेटा जारी केला आहे. मशीन लर्निंग, पायथन, एआय कोअर स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या कौशल्याना सर्वाधिक मागणी असणार आहे.
नॅसकोम आणि बिसीजीच्या मते २०२७ पर्यंत २५ ते ३५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर सह १७ अब्ज युएस पर्यंत पोहोचेल. या वेगवान विस्तारामुळे, कौशल्याची कमतरता देखील वाढत आहे आणि कंपन्या या विकसित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले पात्र व्यावसायिक शोधण्यासाठी धडपडत आहेत. भारतातील जनरेटिव्ह एआय नोकऱ्यांपैकी ४२ टक्के मशीन लर्निंगचा उल्लेख करतात, तर ४० टक्के पायथन कौशल्यांसाठी विचारतात. एआय आणि मशीन लर्निंगमधील लवचिकतेसाठी पायथनचे खूप महत्त्व आहे.
एआय मुख्य कौशल्ये आणि संप्रेषण कौशल्ये देखील शोधली जातात व अनुक्रमे ३६ टक्के आणि २३ टक्के नोकरीच्या जाहिरातींमध्ये दिसतात. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (२० टक्के ), टेन्सरफ्लो (१९ टक्के), डेटा सायन्स (१७ टक्के ) या इतर कौशल्यांची मागणी आहे.इंडिड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले, कि एआय बद्दलच्या जागतिक चर्चेत आघाडीवर राहण्यासाठी भारताने कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना आवश्यक कौशल्ये टिकवून ठेवण्यासाठी अधिक शिकण्यास मदत केली पाहिजे, एआय मध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी ही कौशल्ये शिकण्यासाठी कुमार यांनी याच्या महत्त्वावर जोर दिला.