जालना – जेईई परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत जालन्यातील आयन खंडेलवाल या विद्यार्थ्याने ९९.०३ पर्संटाईल गुण प्राप्त करत घवघवीत यश मिळवले आहे.
जालन्यातील आरपी रोडवरील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते चेतन खंडेलवाल यांचे आयन हे चिरंजीव असून लहान पणापासून त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून आयन याने हे घवघवीत यश मिळवले आहे.
जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी आज बुधवारी सायंकाळी खंडेलवाल यांच्या निवस्थानी भेट देऊन आयन खंडेलवालचे पुष्पगुच्छ देऊन मिठाई देत त्याच्या या यशाचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच आयन खंडेलवाल यास या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे अंकुश सोनवणे यांचाही गोरंटयाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी चेतन खंडेलवाल, रोहित भुरेवाल,अंकित आबड, पंडित उमेश सारस्वत,विजय पवार,किरण झारकंडे आनंद झारकंडे, शिवाजी शेजुळ,अक्षय झारकंडे,संतोष पंगुलवाले आदींची उपस्थिती होती.
























