अक्कलकोट – दत्तगुरुचे अवतार श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनार्थ तीर्थक्षेत्र अक्कलकोटी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे . वाहनांची प्रचंड संख्या अरुंद रस्ते अतिक्रमण रस्त्यावर उभी वाहने ॲटो रिक्षा यामुळे भाविकानां दर्शनार्थ जाणेही प्रचंड त्रासदायक होत आहे .
यामुळे वटवृक्ष मंदिर समाधी मठ परिसर गुरु मंदिर परिसर तातडीन रस्ते रुंदीकरण करणे गरजेचे आहे . अन्यथा भाविकानां ही गर्दी जीवघेणी , अपघाताला आमंत्रण देणारी चेंगराचेंगरी अशा घटनाना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .
शनिवार रविवार बुधवारी रात्री गुरुवार पोर्णिमा अशा वेळी अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांच्या प्रचंड गर्दीने व्यापुन जात आहे . भाविकांची प्रचंड वाहने पार्किंग करिता अपुरी जागा अरुंद रस्ते वाढते प्रचंड अतिक्रमण दुकाने फेरीवाले विक्रेते यामुळे अरुंद होणारी रस्ते यामुळे मंदिर परिसरात वाहनापासुन दर्शनबारी पर्यंत भाविकाना जाणे प्रचंड त्रासदायक जीवघेणे ठरत आहे . लहान मुले वृद्ध महिला आजारी व्यक्ती , यांचे तर या गर्दी मध्ये प्रचंड हाल होत आहेत .
यामुळे दिवसोदिवस वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर मैंदर्गी रस्ता ‘ फत्तेसिंह चौक ‘ बाह्य वळण रस्ता मंगरुळे चौक , माणिक पेठ रस्ता , आदि भागात प्रचंड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . यामुळे या भागातून दर्शन बारी रांगेपर्यत भाविकानां जाणे प्रचंड त्रासदायक बनत आहे . यामुळे तातडीने रस्ते रुंद करणे अतिक्रमण काढणे गरजेचे बनले आहे .

























