सोलापूर – श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै.आ.ह. आब्बा प्राथमिक विद्यालय व श्री चौडेश्वरी प्रशालेचे ” माजी विद्यार्थी संघ मेळावा “समारंभ दि.04 जानेवारी 2026, रविवार रोजी सकाळी ठिक 9 वाजता मोठ्या उत्साहात श्री तोगटवीर सांस्कृतिक भवन येथे साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नागनाथ कोंतम व शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी व माजी अध्यक्ष अरुण माधवराव चिंता, विजय भिमाशंकर उदगिरी, प्रशालेच्या मुख्या. सविता यरझल मॅडम, प्राथ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंप, शाळेच्या सर्व माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी अध्यक्ष अमर उदगिरी, उपाध्यक्ष गुरु पालमूर, सचिव सतीश पेरमाळ, सहसचिव योगेश पोसा व खजिनदार लालप्पा गुर्रम व कार्यकारिणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली श्री अमर उदगिरी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्विप प्रज्वलन करण्यात आले . इ.8 वी इ.9 वी मुलींनी भरतनाट्यम सादर करून सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी शिक्षण संस्थेतील दिवंगत शिक्षकांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मेळावाच्या दुसऱ्या सत्रात शिक्षण संस्थेच्या चारही शाखेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते शाल, बुके व स्मृतिचिन्ह देऊन देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नकलाकार अंबादास कनकट्टी यांचे करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कनकट्टी यांनी विविध पशु -पक्ष्यांचे हूबेहूब आवाज काढून सर्वांना मंत्रमुग्ध केले .
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी पाचशे जणांचा सहभाग होता तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप फडतरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार योगेश पोसा यांनी मानले.

















