अक्कलकोट – येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज रामानंद संप्रदाय तालुका सेवा समिती अक्कलकोटच्या वतीने रक्तदान शिबिर व ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. शहरातील जुन्या राम मंदिरात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रतिमा पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा अध्यात्मिक प्रमुख शरद मते , श्री राजेरायमठाचे अध्यक्ष एडवोकेट शरद फुटाणे , सचिव किसन झिपरे , राम मंदिर चे ट्रस्टी अभय मनुरकर मडिवाळाप्पा बदोले , जिल्हा महिला प्रमुख संजीवनी माने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज अक्कलकोट तालुका सेवा समितीतर्फे व्यसनमुक्ती , नैसर्गिक कच्चे बंधारे बांधणे , मोबाईल टॉयलेट साठी सहा लाख रुपयांची नगरपालिकेला मदत , पादुका दर्शन सोहळा असे उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शरद मते व लक्ष्मण पवार यांनी दिली.
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४६ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास विद्या चव्हाण , अविनाश पाटील , नरसू गावडे ( वागदरी ), मंजुनाथ दुधनी, डॉक्टर अर्जुन जोगदे , युवराज जाधव , प्रकाश मोरे , एलआयसी प्रतिनिधी दत्तात्रय शिंदे , अभिजीत लोके आदिसह साधक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























