काँग्रेसचे ओडिशातील खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं ३५० कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आली.याचाच एक भाग म्हणून टिळक चौकात भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाल निदर्शने करण्यात आली , यावेळी साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं. देशाच्या विकासाला प्राधान्य देण्यात पेक्षा काँग्रेस आणि काॅग्रेस पक्षाच्या नेत्यानी स्वहिताला अधिक प्राधान्य दिल्याने देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख माजी महापौर शोभा बनशेट्टी महिला आघाडीचे अध्यक्षा इंदिरा कुडक्याल माजी नगरसेवक संजय कणके जेष्ठ नेते बाबूराव जमादार ज्ञानेश्वर कारभारी मुस्लिम आघाडीचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जाकीर सगरी नगरसेवक नागेश भोगडे अजित गायकवाड आदीसह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकाऱी कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...