जालना – शहरी जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना खेळाकडे, विशेषतः क्रिकेटसारख्या मैदानी खेळांकडे वळवणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या टूर्नामेंटचे आयोजन शहर प्रमुख दुर्गेशजी काठोठीवाले व शहर संघटक दिनेशजी भगत यांच्या वतीने करण्यात आले असून, उद्घाटन युवा सेना राज्य सचिव व युवा नेते अभिमन्युजी खोतकर तसेच युवा नेते अश्विनजी अंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रिकेटसारख्या खेळाचे आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, नियमित खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्फूर्ती, शिस्त, संघभावना व सकारात्मक जीवनशैली विकसित होते. मोबाईल, व्यसन व ताणतणावापासून युवकांना दूर ठेवण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात.
कार्यक्रमास शहर प्रमुख विष्णुजी पाचफुले, माजी शहर प्रमुख बाला परदेसी, गणेशजी तराशे, माजी शहर प्रमुख घनश्यामजी खाकीवाले, महेशजी दुसाने, कमलेशजी खरे, गोविंद सोनूने, माजी नगरसेवक नितीन जांगडे, माजी नगरसेवक नरेश खुदभैये, जीवन भगत, विक्की विजयसेनानी, सेवकराम नारीयलवाले, सुनिल नंद, मुकेश जांगडे, नंदलाल मेघावाले, मेघराज मेघावाले, रवि दंडाइत, हरिचंद मेघावाले, अजय भुरेवाल, विशेष भगत, नितेश त्रिबंके, मनोज राजपूत, हीरालाल गुरुदेव, बापू शिंदे, उमेश भुरेवाल, कुणाल अनलदास, रोहित भुरेवाल, योगेश देवावाले, सतपाल खाकीवाले, सतपाल काठोठीवाले, सुनिल भगत, अजय काठोठीवाले, मनोज धानुरे यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी धिरज भगत, अभिमन्यु काठोठीवाले, राजेश कांबळे, सुनिल नंद, विक्रम काठोठीवाले, उमेश भुरेवाल, चेतन काठोठीवाले, नरेश भगत, जीवन भगत, विक्की विजयसेनानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही स्पर्धा डी अॅण्ड डिके मित्र मंडळ यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आली असून, युवकांमध्ये खेळाची आवड वाढवणे, आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे व सामाजिक सलोखा जपणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अशा क्रीडा उपक्रमांमुळे परिसरातील युवकांना आपली ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरण्याची संधी मिळत असून, खेळा आणि निरोगी रहा हा संदेश प्रभावीपणे पोहोचत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.


























