Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संतप्त धरण विरोधकांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in marathwada
0
0
SHARES
386
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


माहूर / नांदेड – मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्प ऊर्फ चिमटा धरणाचे सुरू असलेले काम आज शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील खडका येथील प्रकल्प स्थळी हजारोच्या संख्येने एकवटलेल्या धरण विरोधकांनी प्रशासनाला दिलेल्या अल्टीमेटमप्रमाणे पुन्हाएकदा बंद पाडले.
तब्बल २९ वर्षांपासून प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांसह विस्थापित होणाऱ्या नागरिकांचा धरण विरोधी संघर्ष समितीच्या दिमतीने सुरू असलेला प्रचंड विरोध आता शिगेला पोहचला असून,
“प्राण जाए पर,जमिन न जाए!
अशा ठाम निर्धाराने “जान की बाजी” लावण्यापर्यंत धरणाला विरोध वाढला असल्याचे आजच्या धरणविरोधकांच्या आक्रमकतेवरुन दिसून येत आहे.

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिनांक 24 नोव्हेंबर सोमवार रोजी प्रकल्याचे सुरू असलेले काम बंद करण्याबाबत रीतसर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, पोलीस स्टेशन पारवा, पोलीस स्टेशन मांडवी यांना लिखित निवेदन देऊन काम बंद करण्याची विनंती केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने काम बंद न केल्यामुळे दिनांक 29 नोव्हेंबर शनिवारला निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रकल्प स्थळी धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने काम बंद आंदोलन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जमा झाले असता अशाही परिस्थितीत धरणाचे काम सुरूच असल्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रचंड संतप्त झाले. त्यांनी कामावर असलेल्या जेसीबी व टिप्परच्या काचा फोडल्या व त्या वाहनांवर तुफान दगडफेक केली.
दि. 28 नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळ येथे आले असता धरण विरोधी समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी “मी आर्णी व किनवट विधानसभा प्रचारा दरम्यान प्रकल्पाबाबत जे आश्वासन दिले होते त्यावर मी कायम आहे!” असे धरण विरोधी समितीला सांगितले.
शनिवारी पोलीस बंदोबस्तात कार्यकारी जलसंपदा विभाग, यवतमाळ अभियंता सुरज राठोड,अनिकेत गुल्हाने, टेमरे या अधीकाकाऱ्यांसोबत चर्चा झाली. त्यांनी काम बंद करण्याचे आश्वासनही दिले. परंतु, कायमस्वरूपी काम बंद करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यास असमर्थता दर्शविल्याने मोठ्या संख्येने उपस्थित प्रकल्पग्रस्त ज्या ठिकाणी काम चालू होते तेथे गेले.त्यातील काहींनी नंबर नसलेल्या टिप्परचे काचा फोडल्या व उभ्या वाहनांवर तुफान दगडफेक केली.
त्यानंतर जोपर्यत प्रकल्प स्थळावरून उभ्या असलेल्या जेसीबी व टिप्पर हलविण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या मांडू असा आक्रमक पवित्रा धरण विरोधी लोकांनी घेतल्यामुळे पोलीसांनी कामावरील सर्व वाहने पोलिस बंदोबस्तात प्रकल्प स्थळावरून हलविल्यानंतर आंदोलक आप आपल्या गावाकडे परतले.

आजच्या आंदोलनात विदर्भ मराठवाडयातील चार ते पाच हजार महिला पुरुष मंडळी धरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जमा झाले होते.
आजच्या आंदोलनात धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तंवर, बंडुसिंग नाईक, विजय पाटील राऊत, प्रल्हादराव गावंडे सर, बंटी पाटील जोमदे, जयराम मिश्रा, गजानन डाखोरे,डॉ.बाबा डाखोरे,गुलाब मेश्राम,विजय पाझारे, शंकर सिडाम यासह हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी, धरण विरोधक उपस्थित होते.
आता आजच्या या धरणविरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे काहिसे नरमलेले प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रचंड कडाक्याच्या थंडीतही चिमटा धरणावरुन प्रशासनाच्या विरोधातील धरण विरोधी संघर्ष समितीच्या गरमागरमीमुळे प्रकल्प क्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे.

Post Views: 645
Previous Post

सोलापूर येथील नई जिंदगी चौकामध्ये भर दिवसा खून करणारा आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Next Post

सोलापूरमधील पुरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूरमधील पुरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

ताज्या बातम्या

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

जळगावत खेळताना साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचे डोके ॲल्युमिनियमच्या पातेल्यात अडकल्याची घटना घडली आहे

February 18, 2026

सिंधी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या डब्याला आग.#public #solapurnews #viral

February 18, 2026

केरळमध्ये चिमुकलीच्या अवयव दानामुळे मिळाले पाच जणांना नवे जीवनदान.#viral #पब्लिक

February 18, 2026

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

February 18, 2026

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685821

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697