Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर येथील नई जिंदगी चौकामध्ये भर दिवसा खून करणारा आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – प्रशांत पी. राजवैद्य, अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, सोलापूर यांनी आरोपी मुस्ताक नासीर पटेल, रा. सिध्देश्वर नगर, भाग-4, सोलापूर यांस भारतीय दंड संहिता, कलम 302 अन्वये दोषी धरून, त्यांस जन्मठेपेची शिक्षा आणि रक्कम रू.5,000/- दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.

सदर खटल्याची सविस्तर हकीकत अशी की, दि.12/06/2020 रोजी, सकाळी 10.45 वाजताचे सुमारास, सोलापूर येथील नई जिंदगी चौकामध्ये अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेलसमोर आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकिल पटेल याचेबरोबर बाचाबाची करून, भांडणास सुरूवात केली. त्यावेळी मयत शकिल पटेल याने आरोपीस “हमारे बच्चों के उपर झुठे केस करते क्या” असे विचारता क्षणी आरोपी मुस्ताक पटेल याने त्याच्या कमरेजवळ असलेला चाकू काढून मयत शकिल पटेल याच्या छातीवर, पोटावर, हातावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार करून, त्याचा खून केला आणि सदर आरोपी मुस्ताक पटेल याने सदर गुन्हयात वापरलेला चाकू रस्त्याचे कडेला असलेल्या गटारीजवळ टाकून सदर ठिकाणाहून पळून गेला.

सदर घटनेबाबत मयत शकिल पटेल याचा मोठा भाउ अलिमोददीन पटेल याने दि.12/06/2020 रोजी आरोपीविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने, पोलीसांनी आरोपीविरूध्द भारतीय दंड संहिता, कलम 302 तसेच महाराष्ट पोलीस अधिनियम, 135 अन्वये गुन्हा दाखल करून, सदर गुन्हयाच्या तपासास सुरूवात केली असता, सदर प्रकरणातील आरोपी हा स्वतहून एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर झाला होता. त्यामुळे, संबंधीत पोलीसांनी त्यास अटक करून, सदर गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मा. न्यायालयामध्ये त्याचेविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब-3, सोलापूर यांच्याकडे सुरू झाली असता, सरकारी पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या वतीने बचावासाठी एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग एम. राजपूत यांनी असा युक्तीवाद केला की, सदर प्रकरणामध्ये तीन नेत्र साक्षीदार असून, त्यांनी सदरची घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे.

तसेच सदर प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुरावा त्यामध्ये घटनास्थळावर पडलेले रक्ताचे डाग, घटनास्थळाच्या जवळपास गुन्हयात वापरलेला चाकू शाबीत झालेला असून, त्याचेवरील रक्ताचे डाग तसेच आरोपी आणि मयताचे कपडयावरील रक्ताचे डाग या सर्व गोष्टीं प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले असता, त्याचा आलेला अहवाल हा गुन्हा शाबीत करण्यास पूरक असा असल्याने, तो पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असून, त्याला वैद्यकीय पुराव्याची देखील पुष्टी असल्याने, सदर मयताचा शवविच्छेदन अहवाल ज्यामध्ये मयताचे अंगावर एकूण 11 चाकूने भोसकल्याच्या जखमां दिसून आल्याने, तो पुरावा देखील नेत्र साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असा पुरावा असल्याने, सदरचा सर्व पुरावा हा आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकिल पटेल यास नई जिंदगी चौकात चाकूने भोसकून खून केल्याचे सिध्द होत आहे.

सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून, मे. न्यायालयाने आरोपी मुस्ताक पटेल यांस भारतीय दंड संहिता, कलम 302 अन्वये दोषी धरून, त्यांस जन्मठेपेची शिक्षा आणि रक्कम रू.5,000/- दंड तसेच महाराष्ट पोलीस अधिनियम, 135 अन्वये 4 महिन्याचा कारावास आणि रक्कम रू.1,000/- दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.

सदर खटल्यात जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर आरोपीतर्फे ॲङ यू.डी. जहागीरदार यांनी काम पाहिले. तसेच तपासी अंमलदार हेमंत शेंडगे आणि कोर्ट पैरवी म्हणून एस.एस. घाडगे यांनी काम पाहिले.

Post Views: 172
Previous Post

गोविंदपुर – खामसवाडी – मोहा मार्गावरील अरुंद रस्त्यामुळे अपघातात वाढ

Next Post

संतप्त धरण विरोधकांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संतप्त धरण विरोधकांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822778

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697