अक्कलकोट – येथील कु. अंजली बळीराम पवार यांनी आपल्या जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर एस एस सी जे.डी. भरती प्रक्रियेत यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यांनी ही महत्त्वाची निवड मिळवून अक्कलकोट तालुक्याचा नावलौकिक केला आहे.
कु अंजली पवार हिच्या निवडीनंतर सुप्रभात ग्रुपच्या वतीने उद्योगपती श्रीमती गीता कोरे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सुप्रभात ग्रुपचे अध्यक्ष सुनील गोरे, नगरसेवक महेश हिंडोळे रमेश कापसे उद्योगपती विलास कोरे राजशेखर हिप्परगी, सेवानिवृत्त शिक्षिका उषा हंचाटे, विक्रम शिंदे, गजानन पाटील, मल्लिकार्जुन आळगी, पत्रकार शिवानंद फुलारी, स्वामी सेवक श्रीकांत झिपरे, स्वामी समर्थ सेवा आश्रमाचे राजेंद्र महाराज सुरवसे, रामचंद्र समाने , स्वामीनाथ स्थावरमठ, विष्णू सांगळे, दत्ता पाटील, राजकुमार एकबोटे, स्वामीनाथ पाटील, कु. अंबिका बनसोडे, कु.प्रेरणा माने,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. अंजली पवार या अक्कलकोट शहराच्या रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण न. प. मुलींची शाळा नं. १, व माध्यमिक शिक्षण श्री शहाजी हायस्कूल, अक्कलकोट येथे झाले आहे. तर उच्यशिक्षणासाठी त्यांनी सी. बी. खेडगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असून त्याचबरोबर एस एस सी जे.डी. भरतीची तयारी सातत्याने सुरू ठेवली होती. त्यांच्या अथक परिश्रमां नंतर बी. एस. फ. पदासाठी त्यांची निवड झाली आहे.
या यशामागे आई-वडिलांचे मोठे योगदान असल्याचे कु. अंजली सांगतात. त्यांच्या आईचे नाव पिंकी बळीराम पवार असून आईने स्वतः अनेक काबाड कष्ट करून मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठिंबा दिला. “आई-वडील आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादामुळेच आज हे यश मिळाले,” अशी भावना कु. अंजली पवार यांनी व्यक्त केली.
कु. अंजलीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक तरुणांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.


























