सोलापूर : सहस्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सो. स .क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सदस्य मा सुरेश रामकृष्णसा बिद्री लाभले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून वि .मं .ट्रस्टचे सदस्य मा.श्री.संजीव हिरालाल रंगरेज उपस्थित होते .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै . श्री .बाबुरावसा दत्तात्रयसा भूमकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी केले.यावेळी वर्षभरामध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा व खेळाच्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धा बक्षीस देण्यात आले.
सन २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थी म्हणून इ. ४ थी ( शिवनेरी)मधील विद्यार्थी चि .मंजुनाथ योगेश पंगुडवाले वआदर्श विद्यार्थिनी म्हणून कु .माहिरा अब्दुलरहेमान शेख या विद्यार्थ्यांना कै.मोहनलाल माणिकचंद सोनिमिंडे व कै .कमलाबाई मोहनलाल सोनिमिंडे यांच्या स्मरणार्थ ऋषभ ट्रेडर्स कडून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर प्रमुख पाहुणे संजीव रंगरेज यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बिद्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी वि.मं. ट्रस्टचे अध्यक्ष संजीवसा बिद्री, सचिव जयकुमारसा कोल्हापुरे ,शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर, सचिव गजाननसा गोयल, विद्या गोयल,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा माने मॅडम,प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे ,इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सोमण्णा मलकारी यांनी केले व आभार सहशिक्षिका ऐश्वर्या हुळळे यांनी मानले .तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले . इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली संस्कृती जाधव या विद्यार्थिनी नी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माझ्या मनातील छत्रपती शिवराय यांच्यावरील भाषण प्रमुख पाहुण्याच्या समोर सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशसा बिद्री यांनी रोख 501 रुपये बक्षीस देऊन तिचा गौरव केला.


























