वैराग – स्थानिक वैराग विद्यामंदिर हायस्कूल, कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय जीएसटी अधिकारी आनंद खरटमल, धाराशिवचे एपीआय सुदर्शन कासार, विक्रीकर निरीक्षक रोहन गरड आणि नूतन कृषी उपसंचालक कुमारी प्राची श्याम गोवर्धन उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना तसेच शैक्षणिक गुणवत्ता धारकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
आनंद खरटमल: “शिस्त, मेहनत आणि जिज्ञासा हा विद्यार्थी जीवनाचा खरा पाया आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या आवडीचे छंद जोपासा, कारण शाळा ही तुमच्या भविष्यातील प्रयोगांची प्रयोगशाळा आहे.”
सुदर्शन कासार (API): “यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि सातत्य आवश्यक आहे. आयुष्यात ध्येय गाठायचे असेल तर शिक्षकांबद्दल कृतज्ञता बाळगा.”
रोहन गरड: “शालेय जीवनातील अभ्यासाचा पाया जर मजबूत असेल, तर आपण आयुष्यात कोणतेही मोठे यश सहज संपादन करू शकतो.”
प्राची गोवर्धन: “भविष्य घडवण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व क्षेत्रांत महत्त्वाचे ठरते, तोच तुमच्या प्रगतीचा आधार आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा वैद्य यांच्या प्रास्ताविकाने झाली. संस्थेचे अध्यक्ष भूषण भूमकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला, तर दोन्ही प्रशालांच्या कामकाजाचा अहवाल सुप्रिया पांगळ यांनी वाचून दाखवला. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक राम कोळी यांनी करून दिला.
पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांची नावे सचिन डांगे व दत्तात्रय गिड्डे यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कोरशेट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन रेड्डी यांनी मानले.
या सोहळ्याला संस्थेचे सचिव निनाद भुमकर, चेअरमन मृणाल भूमकर, मुख्याध्यापक किशोर इंगळे, अशोक कदम, समद चौधरी, नगरसेवक नागनाथ वाघ, संचालिका प्रेरणा भुमकर, लीना भूमकर, प्राचार्य शाम गोवर्धन आणि समीक्षा भूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ बिदरकोते, हरीश उजनकर, बालाजी राऊत, सुनील खेंदाड, प्रवीण क्षीरसागर, देवेंद्र कर्णे आणि प्रताप माने या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






















