Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वैराग विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वैराग – स्थानिक वैराग विद्यामंदिर हायस्कूल, कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

​कार्यक्रमाचे अध्यक्षपद वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय जीएसटी अधिकारी आनंद खरटमल, धाराशिवचे एपीआय सुदर्शन कासार, विक्रीकर निरीक्षक रोहन गरड आणि नूतन कृषी उपसंचालक कुमारी प्राची श्याम गोवर्धन उपस्थित होते.

​याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना तसेच शैक्षणिक गुणवत्ता धारकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

​आनंद खरटमल: “शिस्त, मेहनत आणि जिज्ञासा हा विद्यार्थी जीवनाचा खरा पाया आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या आवडीचे छंद जोपासा, कारण शाळा ही तुमच्या भविष्यातील प्रयोगांची प्रयोगशाळा आहे.”

​सुदर्शन कासार (API): “यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि सातत्य आवश्यक आहे. आयुष्यात ध्येय गाठायचे असेल तर शिक्षकांबद्दल कृतज्ञता बाळगा.”

​रोहन गरड: “शालेय जीवनातील अभ्यासाचा पाया जर मजबूत असेल, तर आपण आयुष्यात कोणतेही मोठे यश सहज संपादन करू शकतो.”

​प्राची गोवर्धन: “भविष्य घडवण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व क्षेत्रांत महत्त्वाचे ठरते, तोच तुमच्या प्रगतीचा आधार आहे.”

​कार्यक्रमाची सुरुवात कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा वैद्य यांच्या प्रास्ताविकाने झाली. संस्थेचे अध्यक्ष भूषण भूमकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला, तर दोन्ही प्रशालांच्या कामकाजाचा अहवाल सुप्रिया पांगळ यांनी वाचून दाखवला. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक राम कोळी यांनी करून दिला.

​पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांची नावे सचिन डांगे व दत्तात्रय गिड्डे यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कोरशेट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन रेड्डी यांनी मानले.

​या सोहळ्याला संस्थेचे सचिव निनाद भुमकर, चेअरमन मृणाल भूमकर, मुख्याध्यापक किशोर इंगळे, अशोक कदम, समद चौधरी, नगरसेवक नागनाथ वाघ, संचालिका प्रेरणा भुमकर, लीना भूमकर, प्राचार्य शाम गोवर्धन आणि समीक्षा भूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ बिदरकोते, हरीश उजनकर, बालाजी राऊत, सुनील खेंदाड, प्रवीण क्षीरसागर, देवेंद्र कर्णे आणि प्रताप माने या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 30
Previous Post

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षण घ्यावे 

Next Post

टाकळी शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

टाकळी शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न

ताज्या बातम्या

बोगस शाळांवर शिक्षण विभागाचा मोठा दणका

June 10, 2026
महूद परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार

महूद परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार

June 10, 2026
विधानपरिषद मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे देण्यात आले प्रशिक्षण

विधानपरिषद मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे देण्यात आले प्रशिक्षण

June 10, 2026
येत्या आषाढी एकादशीला तरी येथील भव्य व आकर्षक अशानामसंकीर्तन सभागृहाचा लोर्कापण सोहळा होणार का ?

येत्या आषाढी एकादशीला तरी येथील भव्य व आकर्षक अशानामसंकीर्तन सभागृहाचा लोर्कापण सोहळा होणार का ?

June 10, 2026

कंटेनरच्या धडकेतील जखमी पंक्चर वाल्याचा अखेर मृत्यू

June 10, 2026

प्रा.डॉ.रामचंद्र यादव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

June 10, 2026
वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!

June 10, 2026
राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर  यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं – प्रथमेश इंगळे 

राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर  यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं – प्रथमेश इंगळे 

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902633

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697