धाराशिव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी कफील सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी समाजमाध्यमावर जाहीर करत दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले.
कफील सय्यद यांनी यापूर्वी असंघटित कामगार विभागाचे समाजमाध्यम जिल्हाध्यक्ष, कळंब विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तसेच एनएसयुआय जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला असून कोरोना महामारीच्या काळात मोहल्ला क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत मोलाची मदत केली.
या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश प्रभारी अक्षय यादव, दुसरे प्रभारी कांता ग्वाला, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शादाब रहेमान शेख यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

























