Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पहिल्या १०० दिवसांत दिशादर्शक निर्णय घेणार !नव्या उर्जेने सोलापूर शहर घडवूया  : महापौर विनायक कोंड्याल

तरुण भारतbyतरुण भारत
February 11, 2026
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : प्रथम नागरिकपदी विराजमान झालेले महापौर विनायक कोंड्याल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. शहर विकास, डिजिटल प्रशासन, तरुणाई, महिला सहभाग आणि वारसा, सांस्कृतिक जतन या विषयांवर त्यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना मनमोकळेपणाने संवाद साधला. सोलापूरकरांचा विश्वास हेच माझे बळ आहे. सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करणार, असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला. दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांची घेतलेली विशेष मुलाखत अशी……  

 प्रश्न : महापौर म्हणून तुमच्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांचा स्पष्ट रोडमॅप काय असेल? नागरिकांना नेमका काय बदल दिसणार?

उत्तर : पहिल्या १०० दिवसांत आम्ही मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करू. प्रलंबित कामांचा आढावा, विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि वेळबद्ध अंमलबजावणी हा पहिला टप्पा असेल. तक्रार निवारण प्रणाली अधिक वेगवान करून नागरिकांना थेट प्रतिसाद मिळेल याची खात्री करू. नागरिकांना प्रशासन अधिक सक्रिय आणि उत्तरदायी दिसेल, हा आमचा प्रयत्न असेल.

 प्रश्न : सोलापूर शहरातील पाणी, रस्ते आणि कचरा व्यवस्थापन हे कायमचे प्रश्न आहेत. यावर ठोस आणि वेळबद्ध कृती आराखडा काय आहे?

उत्तर : पाणीपुरवठ्यासाठी गळती रोखणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि नियोजनबद्ध वेळापत्रक जाहीर करणे यावर भर असेल. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करून टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण केली जातील. कचरा व्यवस्थापनात घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवणे आणि स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे हे तीन मुख्य मुद्दे असतील.

प्रश्न : महापालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय कसा वाढवणार? गेल्या काही वर्षांत प्रशासकीय राजवट होती, त्यानंतरची ही नवी सुरुवात कशी वेगळी असेल?

उत्तर : नियमित समन्वय बैठक, स्पष्ट संवाद आणि संयुक्त जबाबदारीची पद्धत राबवू. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे निर्णय घेतील, यावर भर राहील. ही नवी सुरुवात अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि सहभागात्मक असेल.

 प्रश्न : तरुणाई आणि महिलांसाठी शहर विकासात कोणत्या विशेष योजना आणणार आहात ? ५० टक्के महिला प्रतिनिधित्वाचा प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत कसा उपयोग होईल ?

उत्तर : तरुणांसाठी कौशल्यविकास, क्रीडा सुविधा आणि उद्योजकता प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार आहे. महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक सुविधा, आरोग्य व स्वावलंबन उपक्रमांवर भर दिला जाईल. ५० टक्के महिला प्रतिनिधित्व हे केवळ आकडेवारी नसून निर्णय प्रक्रियेत संवेदनशील आणि समतोल दृष्टीकोन आणणारी ताकद आहे.

 प्रश्न : सोलापूरच्या आर्थिक विकासासाठी  उद्योग, रोजगार आणि गुंतवणूक याबाबत तुमची ठोस भूमिका काय आहे ?

उत्तर : स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन, नवीन गुंतवणुकीसाठी सुलभ प्रक्रिया आणि औद्योगिक पायाभूत सुविधा मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. टेक्सटाईल, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्राला चालना देऊन रोजगारनिर्मिती वाढवण्याचा प्रयत्न राहील.

 प्रश्न : महापालिकेतील पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी कोणती यंत्रणा राबवणार? ऑनलाइन तक्रार निवारण, ई-गव्हर्नन्स यावर काय भर असेल?

उत्तर : सर्व महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत आणि कामकाजाची माहिती सार्वजनिक करण्याचा आमचा मानस आहे. तक्रार निवारण प्रणाली अधिक प्रभावी करून वेळबद्ध उत्तर देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हीच आमच्या प्रशासनाची ओळख राहील. 

 प्रश्न : महापौर म्हणून सोलापूरसाठी तुमची दीर्घकालीन विकासाची संकल्पना काय आहे?

उत्तर : माझी संकल्पना स्पष्ट आहे. सोलापूर हे केवळ ऐतिहासिक शहर नसून आधुनिक, उद्योगप्रधान आणि नागरिककेंद्री शहर व्हावे. पायाभूत सुविधा मजबूत करताना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन स्तंभांवर आम्ही भर देणार आहोत.

 प्रश्न : पुढील काही महिन्यांत नागरिकांना कोणते ठोस बदल दिसतील?

उत्तर : पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती या मूलभूत सुविधांवर तातडीने लक्ष केंद्रित केले जाईल. तक्रार निवारण प्रणाली अधिक गतिमान केली जाईल, जेणेकरून नागरिकांना वेळेवर प्रतिसाद मिळेल.

 प्रश्न : स्मार्ट सिटी आणि डिजिटल प्रशासनाबाबत तुमची भूमिका काय असेल?

उत्तर : सर्व सेवा ऑनलाइन सुरू आहेत. 

ई-गव्हर्नन्स अधिक सक्षम करून पारदर्शक आणि वेळबद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. नागरिकांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, हा आमचा उद्देश आहे.

 प्रश्न : तरुणाई आणि उद्योग क्षेत्रासाठी काय विशेष उपक्रम राबवणार?

उत्तर : सोलापूरमध्ये लघुउद्योग, टेक्सटाईल आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका पातळीवर सहकार्याचे व्यासपीठ निर्माण करणार आहोत. तरुणांसाठी कौशल्यविकासाशी निगडित उपक्रमांना चालना दिली जाईल.

 प्रश्न : महिलांचे वाढते प्रतिनिधित्व शहराच्या निर्णय प्रक्रियेत कसे उपयोगी ठरेल?

उत्तर : महिलांचा सहभाग म्हणजे संवेदनशील आणि समतोल निर्णयप्रक्रिया. शहर विकासात त्यांचे मत आणि नेतृत्व निर्णायक ठरेल, याची मला खात्री आहे.

 प्रश्न : सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे?

उत्तर : विकास आणि परंपरा यांचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. पारतंत्र्यात तिरंगा ध्वज फडकलेली नवी पेठेतील जुनी नगरपालिकेची इमारत, श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरासह ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करत पर्यटनवृद्धीवर भर देण्यात येईल. 

 प्रश्न : नागरिकांशी थेट संवादासाठी काय योजना आहे?

उत्तर : नियमित ‘जनसंवाद’ बैठक, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून थेट संवादाची व्यवस्था उभारणार आहोत. महापौर कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुले राहील. 

Post Views: 95
Previous Post

पंढरपूर येथे इंडियन आयडॉल विजेती अंजली गायकवाडची “शिवशंभो” भजनसंध्या

Next Post

तिरुपतीत सिंहगड पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

तिरुपतीत सिंहगड पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचा झेंडा फडकावला

ताज्या बातम्या

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर भालो युवा महासंघाचे आंदोलन स्थगित;१५ दिवसांत प्रश्न सोडविण्याची मागणी

September 24, 2026

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या बाल चिमुकल्यांकडून गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जना

September 24, 2026

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारीकार्यालय कार्यान्वित #viral #news #solapurnews

September 24, 2026

उजनीच्या पाण्याबद्दल हे बोलले मुख्यमंत्री #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

आता रुग्ण कुठेही घेऊ शकतात औषध बंधन नाही #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

अजित सृष्टी देखावा पाहून ढसाढसा रडले पार्थ पवार #marathinews #news #viral

September 24, 2026

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1252172

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!