सोलापूर – जिल्हा परिषदेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची कामाचा आढावा घेऊन नियोजन व अंमलबजावणीचे कौतुक केले. या प्रसंगी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव, यांचे सह अभियान कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृध्द अभियानाच्या विविध घटकांचा आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात राज्य स्तरावरून विविध सेलिब्रिटी, किर्तनकार यांचे प्रभावी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत आढावा घेतला. समाज माध्यमांवर सोलापूर जिल्हा परिषदेचे सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या कामाचे नियोजनाचा आढावा घेऊन समाज माध्यमाचा प्रभावी वापर केल्या बद्दल कौतुक केले. अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
या अभियानासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर व ग्रामपंचायती मध्ये सुरू असलेले कामाचे प्रेझेंटेशन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांचे सह विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी प्रत्येक गावास भेट देऊन मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचे कामांना गती देत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले. करसंकलनात उत्कृष्ठ कामे केलेले ग्रामपंचायती, लेखा परिक्षण अहवालाचे शक पुर्तता अभियान, अकोला व गोपाळपूर येथील किर्तनकार कार्यक्रम, ५५ गावात अतिरिक्त ५ ग्रामसेवक कामकाज पाहणे साठी देण्यात आले असल्याचे अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी सांगितले.
कक्षातील जनसंपर्क अधिकारी सचिन जाधव, अधिक्षक सुहास चेळेकर, कक्ष अधिकारी सिध्दाराम बोरूटे, अक्षय स्वामी, अधिक्षक आप्पा भोसले, अभिनव पायंडे उपस्थित होते.
























