मंगळवेढा – येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीची बैठक नुकतीच पाणीपुरवठा सभापती तरन्नुम आझाद दारूवाले यांचे उपस्थित पार पडली.
सदर बैठकीत हजारे गल्ली येथील पाईपलाईन करणे, पाणीपुरवठा विभागाकडे दप्तर ठेवण्यासाठी नवीन लोखंडी कपाट खरेदी करणे, जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीच्या खिडक्यांची दुरुस्ती करणे, संभाजीनगर येथील पाण्याच्या टाकीचे मेन 10 इंची वॉल दुरुस्तीच्या खर्चास मंजुरी देणे, भीमनगर येथील मोटार दुरुस्त करणे, बोराळे नाका येथिल मुस्लिम कब्रस्तान मधील विंधन विहीर दुरुस्ती व साहित्य बसविणे आदी विषयावर चर्चा होऊन सर्व कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
या बैठकीसाठी पाणीपुरवठा समितीच्या सभापती तरन्नुम दारूवाले, सदस्य सोमनाथ हुशारे, प्रशांत गायकवाड, नागर गोवे, सावित्रीबाई कोंडुभेरी तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रामभाऊ पवार, गोरख काकडे, ज्ञानेश्वर टाकणे, संतोष माळी, सागर गडेकर,हणमंत गडेकर व तानाजी इंगळे इत्यादी उपस्थित होते.

























