सोलापूर – दक्षिण तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी महानगर पालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ठेकेदाराकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या कामकाजावर सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दक्षिण तालुक्यामधील लवंगी व भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रातील वाळूचे लिलाव झाले असून ठेकेदाराकडून वाळू उपसा करण्यात येत आहे. मात्र यावेळी महिन्यापासून महसूल विभागातील मंडल अधिकारी व तलाठी निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून या संधीचा फायदा घेऊन राॅयल्टी रक्कम वाढवून व वाळू गाड्यांवर कापड न टाकता वाळू वाहतूक सुरू आहे.
याबाबत महसूल अधिकार्याकडे तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वाळू वाहतूक करणार्या वाहनावर वाळू कापड नसल्याने दुचाकीस्वारांच्या डोळ्यांना वाळूचा त्रास होत आहे. शिवाय रस्त्यावर पाणी पडत असल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
….
तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
…
सोमवारी मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी लवंगी व भंडारकवठे येथील वाळू ठेक्याला भेट देऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले. मात्र ठेकेदाराकडून या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.



















