आटपाडी – दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी न करता, १९६५ पासून अर्थात ६० वर्षापासून सुरू असलेल्या आटपाडीच्या मुळ एस . टी . स्टॅन्डच्या जागी ५० कोटी रुपये खर्चाचे एकच भव्य दिव्य एस . टी . स्टॅन्ड उभे करा . असे आवाहन आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केले आहे .
आटपाडी एस . टी . स्टॅन्डच्या नुतनीकरणासाठी ४ . ५० कोटी रुपयाचा निधी धरल्याचे सांगीतले जाते . मात्र पंचायत समिती आणि एस . टी . डेपोच्या पुढच्या भागात आणखी एक एस . टी . स्टॅन्ड उभारण्याचा घाट काहींनी घातल्याची चर्चा आहे . त्यासाठी वेगळी २७ कोटीची तरतुद केल्याचे सांगीतले जाते . या नव्या एस . टी . स्टॅन्डची उभारणी, मुळ एस . टी . स्टॅन्ड आणि मुळ आटपाडीवर मोठा अन्याय ठरू शकते . याचा पुनर्विचार झाला पाहीजे .
आटपाडीच्या जुन्या स्टॅन्डलाच भव्यता देवून हे एस . टी . स्टॅन्ड ५० कोटी रुपये खर्चाचे भव्य दिव्य केले पाहीजे . राष्ट्रीय महामार्ग करताना ज्या दराने जमिनी अधिग्रहण केल्या जातात . त्याच दराने जुन्या एस . टी . स्टॅन्डसाठी मागे सरकायला जागा हवी असल्यास ती संपादन केली पाहीजे . विकास आराखडा करताना अनेकांच्या जमीन, खुल्या जागांवर आरक्षणे टाकण्यात आली होती . तुर्त ती स्थगित झाली असली तरी भविष्यात विकास आराखड्यासाठी अनेकांच्या शेत जमीन, खुल्या जागा घ्याव्याच लागतील . त्याच न्यायाने मुळ एस . टी . स्टॅन्डच्या विस्तारी करणासाठी योग्य ती पावले टाकली गेली पाहिजेत .
आटपाडी शहराची रौनक , शहराचे नाक, मुळ आटपाडीची अस्मिता असणाऱ्या जुन्या व मुळ एस . टी . स्टॅण्डच्या जागीच नवे भव्य दिव्य असे जिल्हा ठिकाणच्या एस . टी . स्टॅन्ड सारखे हे मुळ एस . टी . स्टॅन्ड साकारले गेले पाहिजे . हेच मुळ आटपाडीचा सन्मान केल्यासारखे होणार आहे .
आटपाडीची मुख्य रस्त्यावरील बाजार पेठ, एस . टी . स्टॅन्डचा परिसर बकाल होऊ नये . प्रगती, विकासापासून मागास रहावू नये, यासाठी मोठ मोठाली कार्यालय – व्यवस्था मुळ आटपाडी लगतच साकारल्या पाहीजेत . हे सर्वपक्षीय, सर्वस्तरातल्या, समाज धुरीणांनी लक्षात घेतले पाहीजे .
आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण परिसरात आटपाडी नगरपंचायतीचे मुख्यालय उभारले गेले पाहिजे . मुळ आटपाडीला त्यामुळे उर्जितावस्था येवू शकते. १५ कोटी रुपयाच्या नगरपंचायतच्या नव्या कार्यालयासाठी तरतुद केली असल्याचेही लोक बोलतात . मुळ आटपाडीचे आणि जुन्या एस . टी . स्टॅन्ड परिसराचे महत्व अबाधीत राहण्यासाठी प्रशस्त असे जिल्हा दर्जाचे एकच एस .टी . स्टॅन्ड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त होणाऱ्या जागेत नगरपंचायतीचे मुख्यालय साकारणे मुळ आटपाडी शहरासाठी आणि तालुक्यातल्या मासाळवाडी, यप्पावाडी, खांजोडवाडी, माडगुळे, लेंगरेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, तळेवाडी, माळेवाडी, बाळेवाडी करगणी, काळेवाडी हिवतड, गोमेवाडी, मानेवाडी, कानकात्रेवाडी, मेटकरवाडी, घुलेवाडी, औटेवाडी, धावडवाडी, तनपूरवाडी, कानकात्रेवाडी, नेलकरंजी, खरसुंडी चिंचाळे, वलवण, मिटकी, बनपूरी, तडवळे, भिंगेवाडी, पुजारवाडी, कौठुळी देशमुखवाडी, आंबेवाडी, बोंबेवाडी इत्यादी निम्म्यापेक्षा ( ३६ ) जास्त गावांसाठी अत्यंत न्यायाचे होणार आहे . उर्वरीत २४ गावांनाही मुळ एस . टी . स्टॅन्डच्या जागीच एकच आणि मोठे स्टॅन्ड झाल्यास मुळ आटपाडी शहराचे महत्व वाढविण्यास उपयोगी ठरू शकते. त्यामुळे मुळ आटपाडीत सक्तीने सोयी सुधारणा केल्या जावु शकतात. या प्रक्रियेतून मुळ आटपाडीही विकसीत होवू शकते . यासाठीही गावेही मुळ ठिकाणीच एस . टी . स्टॅन्ड व्हावे . या भुमिकेचेच जोरदार समर्थन करतील . असा विश्वासही सादिक खाटीक यांनी व्यक्त केला आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























