पंढरपूर – प्रक्षाळपूजे निमित्त रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या सुमारे दोन टन फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्र.व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी पिवळा गोंडा २०० किलो , लाल गोंडा २०० किलो, पांढरी शेवंती २०० किलो, अशोक पाला १०० लडी , कलर गुलाब ३०० बंडल , ओर्केट ४० बंडल, अँथेरियम १०० काडी, शेवंती १५०० काडी, सॉंग २५, ड्रेस ना २५, टेबल पॉम २५, रामबाण ४० बंडल, मोच्या २० बंडल, कारनेशन १५० बंडल इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान मंदिराची ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करुन दिल्याची देखील माहिती व्यवस्थापक राऊत यांनी दिली.
—————-
प्रक्षाळ पूजा पाहिले स्नान विधीपूर्वक संपन्न –
श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा २०२५ यशस्वीरित्या संपन्न झाली. या यात्रेदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली होती, ज्याचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतला. दरम्यान रविवारी सकाळी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा पाहिले स्नान विधीपूर्वक संपन्न झाले. या स्नानवेळी प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश आनेचा, आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार आणि नित्य उपचार विभाग प्रमुख संजय कोकिळ आदी उपस्थित होते.
















