Thursday, September 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कार्तिकी यात्रेच्या काळात आयसीयु सेंटर ठरले रुग्ण भाविकांचे जीवनदाते

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपुर – राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतुन व उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातुन शहराच्या विविध भागात स्थापित केलेल्या सहा आयसीयु सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय  येथे सुमारे  ३५ हजारहुन अधिक रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिपक धोत्रे यांनी दिली.

कार्तिकी यात्रा दि. २६ ऑक्टोबर  ते ५  नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, पुणे विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ६५ एकर, वाळवंट-१, वाळवंट-२, पत्रा शेड, दर्शन मंडप, या शहरातील गर्दीच्या ५ ठिकाणी व उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे असे एकुण ६ आयसीयु सेंटर स्थापन करण्यात आले होते.वारी कालावधीत स्थापित करण्यात आलेल्या आयसीयु सेंटर मध्ये १२७ गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आले.यामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथील आयसीयु सेंटरमध्ये पुरुष ११, व स्त्री ५ अशा तब्बल १६ गंभीर रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच विविध इतर आजारांच्या ४२८ रुग्णांना उपचाराकरीता दाखल करुन त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

या शिवाय रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. रुग्णालयात आलेल्या रुग्ण व नातेवाईकांना परिपुर्ण व उत्कृष्ठ आरोग्य सेवा देण्याकरीता सर्व वैद्यकिय अधिकारी, सहा. अधिसेविका, परिसेविका अधिपरिचारीका, पॅरामेडीकल स्टाफ, व वर्ग ४ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
———————–


बुडालेल्या भाविकाचे वाचविले प्राण –
वाळवंट व नदी पात्रात तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीत बुडालेल्या कर्नाटक येथील रुद्राप्पा गोलार (वय ४५) या इसमास रेस्क्यु करुन बेशुध्द अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे संदर्भित केले. नोडल अधिकारी यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी कळविले. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथील आयसीयु मध्ये बेशुध्द व श्वास बंद असलेल्य अवस्थेत तातडीने दाखल करुन घेतले. फिजीशीयन डॉ. संग्राम गायकवाड, डॉ. सीमा इंगोले यांनी योग्य उपचार सुरु केले व रुग्णास जीवदान दिले.
—————-


हार्ट ॲटॅकचे त्वरीत निदान –
पासष्ठ एकर येथील आयसीयु मध्ये विश्वंभर कारपुरे (वय ६०) रा. भुम या भाविकास हार्ट ॲटॅकचे निदान करण्यात आले व तातडीने आवश्यक उपचार करुन शासनाच्या स्टेमी प्रोजेक्ट अंतर्गत लाईफलाईन हॉस्पीटल येथे पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले. तसेच स्टेमी प्रोजेक्ट अंतर्गत हदयविकाराच्या इतर  ७  रुग्णांवरती या रुग्णालयात मोफत उपचार चालु आहेत.
—————–

फिट्स व शुध्द हरपलेल्या रुग्णाचे वाचविले प्राण –
उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे शिवाजी शामराव निंबाळकर (वय ५०)  मु.पो आमरवाडी जिल्हा कोल्हापुर या रुग्णास वाळवंटात अचानक फिट्स व शुध्द हरपणे अशी लक्षणे असल्याने व रुग्ण बेशुध्द अवस्थेत त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक उपचार केल्यानंतर रुग्ण शुध्दीवर आला.  तीन दिवसानंतर रुग्ण संपूर्णपणे बरा करुन रुग्णास घरी पाठविण्यात आले.
—————–

चार संर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार –
यात्रा कालावधीत एक हजार ७८४ हुन अधिक रुग्णांच्या रक्त, लघवी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या ४१९ रुग्णांचे एक्स रे, २५६ रुग्णांचे सी.टी स्कॅन करण्यात आले. तर  २१४ रुग्णांचे ईसीजी करण्यात आले तसेच ४ सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.प्रसन्न भातलवंडे यांनी दिली.

Post Views: 59
Previous Post

ओंकार साखर कारखान्याची साखर श्री खंङोबाच्या चरणी अर्पण

Next Post

प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

ताज्या बातम्या

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

September 10, 2026
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

September 10, 2026
५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

September 10, 2026

सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन!

September 10, 2026
पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

September 10, 2026

समायोजन रखडले ; वेतनही थांबले

September 10, 2026
अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1187608

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!