बार्शी – बार्शी शहर रिक्षा सेनेची नवीन पदाधिकाऱ्याची निवड शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रिक्षा सेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ बप्पा लावंड, उपशहर प्रमुख उमेश उर्फ बबलू शेट्टी, सचिव दगडू चव्हाण, खजिनदार योगेश डोंबे व संघटकपदी बापू तेलंग यांना कायम ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी आप्पा साळुंखे, बशीर सय्यद, श्रीकांत बिडवे, आकाश लोखंडे, मुन्ना नवगण, अनिल तांबे, अशोक विधाते, बाबा दगडे, सलमान मुलाणी, किरण वायकर, बापू मोरे, सौदा जगताप, पांडू समिंद्रे, अक्षय भालेराव हे सर्व रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
























