१३ सप्टेंबर पर्यंत लाभार्थ्यांनी आधारकार्ड,बँक पासबूक,मोबाईल नंबर सादर करावेत!
-तहसिलदार किशोर यादव यांचे आवाहन
माहूर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
दि.०९ सप्टेंबर
माहुर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालु मोबाईल नंबर यापूवी सादर केलेले नाहीत त्यांनी संलग्न करणे साठी तहसिल कार्यालय माहूर येथे ते सर्व सादर करावेत.सप्टेंबर २०२४ पासुन महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.त्याशिवाय सप्टेंबर २०२४ चे अनुदान मिळणार नाही. याबाबत शासनाचे सक्त निर्देश आहेत.लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रासह,मोबाईल क्रमांक तहसील कार्यालय माहूर येथे सादर करण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ पासुन महा डीबीटी द्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड,बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि चालु मोबाईल नंबर संलग्न करणे साठी तहसिल कार्यालय माहूर येथे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करावेत. सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर हे २०२४ पासून महा डीबीटी द्वारे शासन स्तरावरुन थेट खात्यात जमा केले जाणार आहे.
सदर माहिती सादर न केल्यास १५ सप्टेंबर २०२४ पासुन लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.. याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र सादर करावेत! असे आवाहन तहसिलदार किशोर यादव यांनी केले आहे.