भोकर(प्रतिनिधी)तत्कालीन तलाठी महेश जोशी व कार्यरत मंडळ अधिकारी मनोज कंधारे यांनी १/१/२२ ते १/६/२४ या कालावधीत त्यांनी केलेल्या फेरफार च्या कागदपत्राची चौकशी करण्यात यावी व त्या कागदपत्रांची सत्यप्रत देण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी करुनही माहिती देण्यात आली नाही दरम्यानच्या कालावधीत अनेक बोगस फेरफारची कामे केली
या कामात लाखो रुपयाचा व्यवहार करण्यात आला वरिष्ठांची दिशाभूल करुन बोगस फेरफार ची कामे करण्यात आली तत्कालीन तलाठी जोशी यांनी बदली करुन घेतली बेकायदेशीर बोगस फेरफार लावून अर्थीक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते शमीम ईनामदार यांनी निवेदनाद्वारे केली व या मागणीकरिता दि.९ पासून तहसील कार्यालयासमोर बेमूदत साखळी उपोषण सूरु केले आहे.