नांदेड – इस्लापूर येथे वर्षानु वर्षा पासून चालत असलेला सत्संग सोहळा दरवर्षी प्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर काकडा आरती सांगता निमित्त भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन गजानन भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी इस्लापूर यांनी दि.04/11/2025 रोजी सांयकाळी ठिक 8 वा. आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील नामांकित भजनी मंडळ श्री हनुमान भक्त भजनी मंडळ राहटी (गं प) ता.उमरी जि.नांदेड भजनी मंडळाचे प्रमुख: ह.भ.प.श्री.भगवान पाटील गायकवाड व श्री. हरीकृपा भजनी मंडळ वरडा ता. नायगाव जि.नांदेड भजनी मंडळाचे प्रमुख: ह.भ.प. श्री. सोपान पाटील गिरे या दोन्ही भजनी मंडळाचा जंगी सामान्याचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील सर्व भजन प्रेमीनी या भजनाचा आवश्य लाभ घ्यावा.
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वी पासून महत्व आहे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनांदतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापासून सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरु असतो. इस्लापूर नगरीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन गजानन भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी ईस्लापुर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























