जालना – भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील अनेक लाडक्या बहिणींचे शासनाच्या सर्व नियमात बसत असुन सुद्धा केवायसी करून सुद्धां माहे मे 2025 पासून पैसे च न आल्याने लाडक्या बहिणी ज्यांना खरोखर गरजवंत आहेत . त्यांनां पैसेच येणे बंद झाल्याने शासनाविरोधात प्रचंड लाडक्या बहिणी मध्ये असंतोष पसरला आहे.
आंधळ दळतच अन कुत्र पीठ खातय या म्हणीप्रमाणे सगळा सावळागोंधळ झाल्याचा आरोप लाडक्यां बहिणींनी आरोप केला आहे. असंख्य लाडक्या बहिणी ह्यांनी ज्यांना पैसे येणे बंद झाले त्या त्या महिलांनी भोकरदनच्या तालुका महिला बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात तक्रार करण्यासाठी गेल्या असतां तेथीलं कार्यालयातील शिपाई जाधव हा महिलांशी व ऑफिसमधे गेलेल्या नागरिकांशी असभ्यपणे बोलतो.
कार्यालयातील कर्मचारी हे तक्रार घेत नाहीं हे सगळे वरून बंद झालेले आहे. आम्ही तक्रार घेऊ शकत नाही. ह्या कार्यालयाचे तालुका अधिकारी जारवालं हे कधीच कार्यालयात हजर राहत नाहीं. हे कार्यालय म्हणजे असुन नसल्यारख झालेले असुन, जिल्हाधिकारी, व मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांनी तातडीने लक्ष देऊन पारध व परिसरातील ज्या लाडक्या बहिणीचे पैसे सर्व नियमात बसत असुनसुद्धां वंचित ठेवलेले आहे . त्यांची शासनस्तरावर विचार करून ह्या लाडक्यां बहीणींचे थकित पैसे देण्याची मागणी मोठया प्रमाणात होत आहे.















