अक्कलकोट – तालमय तबला, सुरात वाजणारी पेटी, खणखणीत वाजवणारे टाळ आणि दाद देणारे रसिक त्यातून प्रबोधनपर भारुड, पोवाडे, विनोदी जलसे, बहारदार लोकगीते यामुळे श्रमसंस्कार शिबिरातील वातावरण पुरते रसिकमय झाले .
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर सध्या वागदरी येथे सुरू आहे. या शिबिराच्या प्रसंगी ग्रामस्थांचे भारुड, नाट्य, जलसा, पोवाडे या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी भारुडकार दिनकर कदम यांचा कार्यक्रम कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी बसवराज शेळके, राजश्री शेळके, बा .ना. चव्हाण, प्रा प्रदीप पाटील, प्रा भीम सोनकांबळे, प्रा सोनाली कटकधोंड, प्रा ओंकार घिवारे उपस्थित होते.
भारुडकार दिनकर कदम यांनी
जलसा, गाणी, नृत्य, संवाद, विनोद आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अंधश्रद्धानिर्मूलन,व्यसनमुक्ती,स्त्री-सक्षमीकरण, स्वच्छता, मतदानाचे महत्त्व असे विषय प्रभावीपणे मांडले करमणूक आणि प्रबोधन यांचा समतोल साधला.सामाजिक अन्याय, जातिभेद, स्त्रियांचे प्रश्न, शिक्षण, गरिबी अशा विषयांवर नाटके सादर केली. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी आधुनिक काळातील सामाजिक विषयांवर पोवाडे सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले लोकगीतांमधून ग्रामीण जीवन, श्रमसंस्कृती, स्त्रियांचे प्रश्न, सामाजिक भावना व्यक्त केल्या. ही गीते समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतात असे शेवटी कदम यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी केले आभार समर्थ पवार यांनी मानले
वागदरी येथील शिबिरात प्रबोधनपर कार्यक्रम सादर करताना दिनकर कदम व त्यांचे सहकारी.

















