अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर भोकरदन पोलिसांनी पकडले,
वाळू चोरांवर पोलिसांची करडी नजर, कारवाईची मोहीम तीव्र करणार
भोकरदन : भोकरदन शहरातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात रविवारी सकाळी ११ वाजता शासनाची कोणतीही परवानगी नसताना अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर भोकरदन पोलिसांनी पकडले. यामध्ये सुमारे १ ब्रास वाळू असून ट्रॅक्टर त्याचे अंदाजे किंमत ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान भोकरदन शहरातुन विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून संतोष नारायण मोरे हे वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, सहाय्यक फौजदार बी.बी. जाधव, पोलीसकॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक, गणेश घुशिंगे यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. दरम्यान, भोकरदन परिसरातील अवैध धंद्याचे प्रमाण वाढल्याने, पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भोकरदन परिसरामध्ये नांजा, गोकुळ, केदारखेडा, सिरसगाव आदी गावातील नदीपात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असतो. अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी यापुढेही कडक कारवाई करणार असल्याचे भोकरदन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी यांनी सांगितले.