सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून केले काम
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड : घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव व गुरु पिंपरी येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असलेला शेत रस्ता समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी स्वखर्चाने दुरुस्त केला. हा रस्ता अतिशय दर्जेदार पद्धतीने तयार झाल्याने शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.
गुरूपिंपरी ते शिंदेवडगाव हा ३ कि. मी अंतराचा शेतरस्ता अनेक वर्षपासून नादुरुस्त होता. पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय बनायचा त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाने बंद व्हायचे. ही अडचण शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांच्याकडे मांडली होती. हा रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार करून देण्याचा शब्द सतीश घाटगे यांनी काही दिवसापूर्वी दिला होता. त्यानुसार या रस्त्याचे उद्घाटन समृध्दी कारखान्याचे संचालक रणजित उढाण यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
दुसऱ्या दिवशी संपूर्ण रस्ता तयार देखील झाला आहे. यावेळी प्रभाकर धांडे, बाबासाहेब हरबक, ज्ञानेश्वर काळे, गणेशराव गव्हाणे, डिगांबर गव्हाणे, शाखाअध्यक्ष ओमप्रकाश गीऱ्हे , ताराचंद गव्हाणे, भास्कर नरवडे, शाम जाधव, शाम गव्हाणे, विठ्ठल गव्हाणे, मोहन काकडे, योगेश दाते, विकास गव्हाणे व शेतकरी उपस्थित होते. शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.