सोलापूर – महानगरपालिका नागरी दलितेतर योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २२ मधील बुवा गल्ली येथे १४ लाख १८ हजार ४९२ रुपयांच्या रस्ता कामाचे उद्घाटन उत्साहात पार पडला. या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग २२ च्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. त्या घोषणेची पूर्तता करत विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा होईपर्यंत डोक्यावर फेटा न बांधण्याची घेतलेली भूमिका ही जनतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवणारी असल्याचे मत नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रभाग २२ चा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे मार्गदर्शन तसेच विद्यमान नगरसेवक दत्तात्रय नडगिरी, चैत्रालीताई शिवराज गायकवाड आणि अंबिकाताई नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभाग २२ मध्ये आता केवळ आश्वासने नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून विकास दिसत आहे. रस्ता कामाचा हा शुभारंभ आगामी सर्वांगीण प्रगतीचा नांदीघोष ठरत असून, परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.


























