सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेल्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा बसला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे.सोलापुरात महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना प्रदेश पातळीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या 20 उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांचे काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव होते. प्रभाग 16 मधून काँग्रेस फिरदोस पटेल, सीमा यलगुलवार, नर्सिंग कोळी अशा तीन उमेदवारांची नावे जाहीर केली होती. फिरदोस पटेल या खासदार प्रणिती शिंदेंच्या अत्यंत विश्वासू नेत्या मानल्या जातात. पण त्यांनी रविवारी 28 डिसेंबर रोजी एमआयएमच्या वरीष्ठ नेत्यांना भेटून प्रभाग 16 मधून उमेदवारी मागितली. प्रभाग 16 हा मुस्लिम बहुसंख्याक असलेला प्रभाग असल्याने फिरदोस पटेल यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे काँग्रेस सोडून जाण्याचा आणि एमआयएमकडून निवडणूक लढवण्याचा ठरवले. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली आहे


























