दिल्ली – लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. या शक्तिशाली स्फोटामुळे सर्वत्र भीती पसरली. जवळपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्या फुटल्या आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका कारमध्ये हा स्फोट झाला असून जवळच्या 3 गाड्यादेखील यात जळाल्या आहेत. संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. 2 ते 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तेथे लोकांचीदेखील गर्दी झाली.

पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तपास सुरु आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिसांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान लाल किल्ला परिसर हा दिल्लीतील सर्वात वर्दळीच्या आणि दाट लोकवस्तीच्या क्षेत्रांपैकी एक आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याची नोंद झाली. त्यानंतर जवळच उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांनाही आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले.


























