अणदूर – जवळपास सर्वत्र विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने,तडाखा दिल्याने वरूण राजा हतबल झाला असून,हाता तोंडाला आलेल्या पिकावर संक्रांत आल्याने अगोदरच मेताकुटीला आलेला बळीराजा या आसमानी संकटाने उघडा पडल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर,नळदुर्ग, जळकोट, ईटकळ, शहापूर , काटगाव जवळपास संपूर्ण तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे पुन्हा कंबर्डे मोडल्याने दुहेरी संकटात सापडला आहे.
आज दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 4 .00 वाजल्यापासूनच सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गारांच्या पावसाने उभ्या पिकावर व राशी करता काढून टाकलेल्या पिकावर पावसाने जबरदस्त दणका दिला आहे. या अवकाळी पावसात ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्ष, आंबा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उघडा पडला आहे.गहू ज्वारीच्या राशीचा सिझन असल्याने रानात कापून ठेवलेले पिक अक्षरशा वाहून गेले आहे, या अवकाळीने शेतकरी पार मोडून पडला असून त्याला शासनाने मदत करावी अशी मागणी होत असून,अगोदरच
विजेचा अवेळी पुरवठा, बहुतेक साखर कारखान्याने उसाचे बिल शेतकऱ्यांना न दिल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळीचा सामना शेतकऱ्यांना जीव घेणारा ठरत आहे. या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद घोडके यांनी केली आहे.























