मोहोळ – नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दत्तात्रय खवळे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत खवळे हे प्रभाग ४ मधून भाजप तर्फे प्रभाग मधून निवडून आले आहेत. भाजपचे २० पैकी११ सदस्य निवडून आले आहेत.
पक्ष नेतृत्वाने उपनगराध्यक्ष पदासाठी खवळे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहोळ नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने माजी नगरसेवक तथा निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांना तर शिंदे सेनेने दौलतराव उर्फ बंडू देशमुख यांना संधी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासाठी सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी सौ. शीतल यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांच्या अत्यल्प मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. दौलतराव उर्फ बंडू देशमुख यांनी प्रभाग नऊ मधून शिंदे सेनेतर्फे निवडणूक लढविली होती.मात्र त्यांचा निसटत्या मताने पराभव झाला होता.त्यामुळे त्यांना पक्षाने संधी दिली आहे.
सुशील क्षीरसागर यापूर्वी नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर, गटनेते सतीश काळे यांनी अभिनंदन केले आहे.


















