पिलीव – माळशिरस तालुक्यात प्रथमच भाजपने प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत पंचायत समीती व जिल्ह्य परिषद उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात भाजपच प्रथमच यंदा पंचायत समीती व जिल्ह्य परिषद निवडणुकीत पुर्ण ताकदनिळशी उतरला आहे .
काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मांडवे येथुन माळशिरस तहसील कार्यालयापर्यंत चारचाकी गाड्यांची रॅली काढण्यात आली.माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन उमेदवार निश्चीत केले .यावेळेस उमेदवारी देताना प्रत्येक उमेदवाराचे कार्य,तसेच जातीय समीकरणे जुळवून उमेदवार दिले आहेत. तालुक्यातील सर्व 9 जिल्ह्य परिषद गट व 18 पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत.
या सर्वाचेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसीलदार कार्यालयासमोर प्रचंड गर्दी केली होती.हे उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्ह्य परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, शिवप्रसाद दुध संघाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे,धनगर आरक्षण कृती समीतीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, माजी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, तालुका अध्यक्ष शरद मदने, माजी सभापती ज्योती माने, राजकुमार पाटील, नाथा लवटे, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, अकलूज मंडल अध्यक्ष सुजय माने,माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, सोमनाथ भोसले ,माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, यांच्यासह तालुक्यातील भाजपचे आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, महाराष्ट्रात मुखयमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार तर नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेतील दैदीप्यमान यशानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे .यामुळे आगामी जिल्ह्य परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा भाजपा दैदीप्यमान यश संपादन करेल असा ठाम विश्वास माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी व्यक्त केला आहे.


























