तभा फ्लॅश न्यूज/विकास वाघ : कळंब तालुक्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) नव्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली असून, या नव्या संघटनेत नव्या चेहऱ्यांचा समावेश करत पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे. भाजपा कळंब ग्रामीणच्या माजी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती:
-
तालुका उपाध्यक्ष : लक्ष्मण देशमुख (जायफळ), किरण पाटील (शिराढोण), शरद भिसे (एकुरका), किरण पाटील (खामसवाडी), अनंत बोराडे (डिकसळ), बाळासाहेब पवार (जवळा), फिरोज पठाण (रांजणी)
-
तालुका सरचिटणीस : संतोष कस्पटे (हिंगणगाव), माणिक बोंदर (वडगाव)
-
तालुका चिटणीस : संभाजी जाधव (लोहटा प.), अनिल माळी (नायगाव), दिलीप कापसे (गौरगाव), अमोल सरवदे (पाडोळी), आशोक इरपतगिरे (वाठवडा), रामेश्वर आवाड (आवड शिरपूरा)
-
कोषाध्यक्ष : संजय अडसूळ (लोहटा पश्चिम)
मोर्चा अध्यक्षांची निवड:
-
महिला मोर्चा : छायाताई बोंदर (देवधानोरा)
-
युवा मोर्चा : सोमनाथ टिंगरे (वाठवडा)
-
किसान मोर्चा : सूर्यकांत पाटील (गोविंदपूर)
-
ओबीसी मोर्चा : तात्याराव जाधवर (ताडगाव)
-
अल्पसंख्यांक मोर्चा : रफिकभाई सय्यद (डिकसळ)
-
अनुसूचित जाती मोर्चा : तुषार शिंदे (लोहटा पूर्व)
विशेष निमंत्रित मंडळात समावेश:
या कार्यकारिणीत अशोकभाऊ शिंदे (वाकडी), संजय पाटील (खामसवाडी), वैभव मुंडे (गोविंदपूर), संजय बापू घोगरे (एकुरका), शिवाजीराव पवार (करंजकल्ला), विष्णू काळदाते (आवड शिरपूरा), सुरेश महाजन (शिराढोण), बालासाहेब एडके (रायगव्हाण) यांच्यासह एकूण 60 हून अधिक स्थानिक कार्यकर्त्यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या नव्या कार्यकारिणीमुळे भाजपच्या तालुकास्तरीय संघटनेला नवा उत्साह मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पक्ष बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, पुढील स्थानिक निवडणुकांसाठी तयारी सुरु झाली असल्याचे संकेत या घोषणा सोहळ्यातून मिळाले.