Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहस्त्रकुंड सिंचन प्रकल्पाला गती : जलसंपदा मंत्र्यांकडून दोन महिन्यांत कार्यवाहीचे लेखी आश्वासन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2025
in marathwada
0
सहस्त्रकुंड सिंचन प्रकल्पाला गती : जलसंपदा मंत्र्यांकडून दोन महिन्यांत कार्यवाहीचे लेखी आश्वासन
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड बहुउद्देशीय सिंचन प्रकल्पासंबंधी महत्त्वपूर्ण लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी १६ वर्षांपासून रखडली असून, त्यास गती देण्याच्या दृष्टीने किनवट माहुर विधानसभे आमदार भीमराव केराम यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावर जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी “पुढील दोन महिन्यांत प्रकल्पासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल,” असे लेखी आश्वासन विधिमंडळात दिले.

राज्य सरकारचे लेखी आश्वासन :

आ. भीमराव केराम यांनी हा प्रश्न विधानसभेत अत्यंत ठामपणे मांडल्यावर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन देत सांगितले की, “सहस्त्रकुंड प्रकल्पास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल.”

प्रकल्पाचा थोडक्यात इतिहास :

  • सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पाचा प्रारंभिक उद्देश यवतमाळ जिल्ह्यातील अंदाजे १२,२४० हेक्टर दुष्काळी, डोंगराळ व आदिवासी भागाला सिंचनाचा लाभ देणे होता.
  • दि. २० जुलै २००९ रोजी रु. ५८३ कोटींना मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
  • पुढे किनवट व माहूर या आदिवासी तालुक्यांनाही या प्रकल्पात समाविष्ट करावे, अशी मागणी झाली.
  • मात्र जानेवारी २०११ मध्ये पार पडलेल्या पर्यावरण जनसुनावणीत बाधित गावातील ग्रामस्थांनी बुडीत क्षेत्र जास्त असल्याने तीव्र विरोध केला.
  • त्यानंतर दि. २२ मार्च २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात भूसंपादन आणि पुनर्वसन खर्च वाढल्यामुळे सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रकल्पातील विलंबाचे कारण :

  • सुधारीत आराखडा तयार केल्यानंतर प्रकल्पाची व्यापती बदलल्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (MWRRA) ने दि. १३ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकल्पास दिलेली मान्यता स्थगित केली.
  • यानंतर कोणतीही कामे किंवा खर्च करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
  • ही स्थगिती दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी उठवण्यात आली, आणि प्रकल्पाला नव्याने चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले.

 

सुधारीत प्रस्ताव व सद्यस्थिती :

सुधारित आराखड्याचा आधार घेऊन शासनाने दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी रु. ७०७४.३६ कोटी किंमतीचा प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव दि. १६ जून २०२५ रोजी राज्य तांत्रिक सल्लागार समिती (SLTAC), नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आला. SLTAC ची २३४ वी बैठक दि. २५ जून २०२५ रोजी नाशिक येथे झाली. त्यात प्रकल्पाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली असून, समितीची सहमती घेऊन अंतिम प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. यानंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (MWRRA) अंतिम मान्यतेसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

प्रकल्पाचे फायदे व महत्त्व :

सुधारीत प्रकल्पाअंतर्गत नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील एकूण अंदाजे ३२,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २०५ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार असून, डोंगराळ व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.पाळीव प्राणी, वन्यजीव, तसेच संपूर्ण पर्यावरणीय परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होईल. क्षेत्रातील शेती उत्पादन वाढून, स्थलांतर आणि पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात कमी होईल.दोन दशकांपासून रखडलेल्या सहस्त्रकुंड सिंचन प्रकल्पास अखेर गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळाल्यास यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांतील शेतकरी, आदिवासी समाज व ग्रामीण जनता यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, हे आश्वासन प्रत्यक्षात उतरणे आणि निधीचे निर्गमण होणे हे आता महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत. स्थानिक जनतेला आशा आहे की, शासन यावेळी आपल्या वचनाला न्याय देईल.

Post Views: 81
Previous Post

आनंद शिंदे आत्महत्या प्रकरण : शकलेश जाधव यास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

भाजप कळंब तालुक्यात नवे दमदार नेतृत्व; तालुका कार्यकारिणी जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भाजप कळंब तालुक्यात नवे दमदार नेतृत्व; तालुका कार्यकारिणी जाहीर

भाजप कळंब तालुक्यात नवे दमदार नेतृत्व; तालुका कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1236721

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!