मोडनिंब – पक्षप्रवेशाचा निर्णय हा विकास, संघटनात्मक बळ आणि जनहिताच्या कामासाठी घेतला आहे. भाजपच्या विचारधारेत काम करताना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे मत वैभव मोरे यांनी व्यक्त केले.मोडनिंब (ता. माढा) येथील शिवसेना शिंदे गटाचे माढा तालुकाध्यक्ष वैभव मोरे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजप नेते तथा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजित बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी माजी सभापती शिवाजी कांबळे, कैलास तोडकरी, राहुल पाटील, धनाजी लादे, प्रशांतराजे पाटील, शहराध्यक्ष राहुल गांधी, शहाजी माळी, सुनील पंडित, संपत महामुनी, अजय चोपडे, चांगदेव वरवडे, सत्यनारायण गिड्डे, संतोष पाटील, राहुल केदार, सोमनाथ टिंगरे, विजयकुमार परबत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या जाहीर प्रवेशामुळे भाजप संघटना अधिक बळकट होणार असून, या प्रवेशाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.


























