सांगोला – नाझरे, ता.सांगोला येथे राजयोगी रंगनाथ स्वामी यांचा जन्मदिन व पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
राजयोगी रंगनाथ स्वामींनी धर्मरक्षणासाठी घरदार सोडले व बारा वर्षे तपश्चर्या करून श्री दत्तगुरूंनी त्यांना दर्शन दिले. तसेच बारा वर्षानंतर रंगनाथ स्वामी पंढरपूरला आले व त्यानंतर नाझरे येथे आले. तसेच त्यांनी अनेक वर्षे निगडी येथे वास्तव्य केले.
राजयोगी रंगनाथ स्वामी महाराजांचे धर्मरक्षणाचे कार्य मोठे असून अशा या संताच्या विचाराची आज ही गरज आहे, असे उदगार हभप.वंदनाताई कापरे यांनी याप्रसंगी काढले. यानिमित्त श्री रंगनाथ श्रीकृष्ण दीक्षित सेलूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिंडी प्रदक्षिणा घालून महाप्रसाद वाटप करण्यात आला.






















