अक्कलकोट – दुधनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ झाला असून शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हैत्रे हे २८६८ मताचे आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपचे अतुल मेळकुंदे यांचा दारुण्य पराभव झाला आहे. नगरपरिषदेतील २१ पैकी २१ जागांवर शिवसेना उमेदवार विजय झाले असून भाजपाचे हातून सत्ता हिसकावून घेण्यात यश आला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत आघाडी कायम राखत अखेर नगराध्यक्ष पदावर प्रथमेश म्हैत्रे यांचा विजय निश्चित झाला. निकाल जाहीर होताच दुधनी शहरात शिवसैनिक व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत विजय साजरा करण्यात आला.या निवडणुकीत विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर शिवसेनेला मतदारांनी भरभरून कौल दिल्याचे बोलले जात आहे. २१ पैकी २१ जागा जिंकत ‘क्लीन स्वीप’ साध्य झाल्याने दुधनी नगरपरिषदेवर शिवसेनेचे एकहाती सत्ता आले आहे.या ऐतिहासिक निकालामुळे दुधनी शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
चौकट
महाराष्टात दुधनी नगरपालिका निवडणुकीने इतिहास घडविला असून गेल्यावेळी सत्ताधारी असलेल्या भाजपला साधा खातेही खोलता आले नाही.म्हेत्रे घराण्या बाबत भाजपा कडून अपप्रचार करण्यात आला.ते दुधनी जनतेला पटला नसल्याने दुधनी करानि भाजपला चोख प्रतिउत्तर दिले आहे.सोलापूर लोकसभा मतदार संघात सात विधानसभा मतदार संघात पाच शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.
महेश नाना साठे,शिवसेना शिंदे गट
सोलापूर लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख
चौकट
“हा विजय केवळ माझा नसून संपूर्ण शिवसेना आणि दुधनीकर जनतेचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू,” असा विश्वास व्यक्त केला.
– नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रथमेश म्हैत्रे

























